कंचनसुधा विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कंचनसुधा विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

येवला . प्रतिनिधी

येथील कंचनसुधा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.  याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पी.एन.पांडा, उपमुख्याध्यापक एस.पी. भावसार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांपैकी श्रावणी गुब्बी हिने काव्यगायण सादर केले. मयंक झाल्टे, तनुष्का वाटाणे, श्रुतिका मांढरे, यांनी आपल्या भाषणातून तसेच इयत्ता ८ विच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करून व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून गुरु विषयी आपला आदर व्यक्त केला. यावेळी सहावीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले भजन सर्वांना मंत्रमुग्ध करून गेले. पांडा व भावसार यांनी गुरुपोर्निमेविषयी महत्व पटवून दिले तर विश्वजा लाघवे यांनी जीवनातील गुरूंचे स्थान पटवून दिले.
कार्यक्रम यशस्वीततेसाठी सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख वर्षा जयस्वाल, क्रीडा शिक्षक गोरख भामरे यांनी विशेष परिश्रम घेतले.  विद्यार्थी आयुष विश्वकर्मा ह्याने सूत्रसंचालन केले तर शिक्षक सतिष निकम यांनी आभार व्यक्त केले.  शाळेचे संस्थपाक अजय जैन, समन्वयक अक्षय जैन यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने