बनकर पाटील पब्लिक स्कूल मध्ये रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा



बनकर पाटील पब्लिक स्कूल मध्ये  रक्षाबंधन   कार्यक्रम उत्साहात साजरा

येवला : पुढारी वृत्तसेवा
 
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बनकर पाटील पब्लिक स्कूल,अंगणगाव येथे अध्यक्ष प्रवीण बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांचा रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक जेष्ठ सहकार नेते अंबादास बनकर यांनी विद्यार्थिनींकडून राखी बांधून घेत सर्वांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य पंकज निकम उपस्थित होते. 
   
रक्षाबंधन निमित्ताने शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करत प्रतीकात्मक राखी बनवत सर्वांची मने जिंकून घेतले. 
यावेळी मुलांना रक्षाबंधन तसेच नारळी पौर्णिमा बद्दलचे महत्व व परंपरा सांगण्यात आली. याप्रसंगी शाळेतील मुलींनी आपापल्या वर्गातील सर्व मुलांना राखी बांधत भावाबहिनीच्या अतूट नाते वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला. शाळेच्या पूर्वप्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी लोकर, कापूस, भोपळ्याच्या बिया, कागद इ चा वापर करत पर्यावरण पूरक आकर्षिक राख्या बनविल्या. दरम्यान विद्यार्थ्याना शाळेमध्ये रक्षाबंधन निमित्ताने चॉकलेटचे वाटप करण्यात आले.     
    या कार्यक्रम प्रसंगी शिक्षक रुपाली चव्हाण, दीपक देशमुख, विकास मोरे, पंकज मढवई, प्रशांत तात्पुरकर, शिवाजी झांबरे, दिपाली जाधव, योगिता शिंदे, शुभदा रसाळ , ममता परदेशी, माळवदे उज्वला, लोंढे जयश्री , वाकचौरे वंदना, कासले प्रियंका, वैराळ प्रियंका, सागर रोकडे, खैरनार शीतल, कोळस शीतल, वृशाली पानगव्हाने, नेहा सोनार, शुभांगी पटेल, सुवर्णा आहीरे , योगेश बोराळे, वैष्णवी पटेल व  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो : 

मानवी साखळी पद्धतीने प्रतिकात्मक राखी 

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने