वादग्रस्त विधान करणारे लेखक आशिष नंदी यांना तात्काळ अटक करावी – खा.समीर भुजबळ

नाशिक: मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय समाजाला भ्रष्टाचारी म्हणून संबोधणा-या  वादग्रस्त लेखक आशिष नंदी यांना त्वरीत अटक करावी या मागणीसाठी नाशिक शहर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षातील  बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन बहुजन समाज  कृती समिती ची स्थापना केली. भुजबळ फार्म येथे या समितीची  बैठक घेऊन नंदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांना निवेदन दिले. तसेच सरकारवाडा पोलीस ठाण्यात नंदी यांचे विरुद्ध सातपूरच्या समाधान जयदेव जगताप यांनी अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला. यावेळी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील नेते,कार्यकर्ते तसेच बहुजन समाजातील विविध समाजाचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  
भुजबळ फार्म येथे झालेल्या बैठकीला चांदवड पंचायत समितीचे सभापती उत्तम आहेर,राष्ट्रवादी काँग्रेस चे नाशिक चे नगरसेवक संजय साबळे, सिन्नर चे नगरसेवक संजय झगडे,अशोक जाधव, महात्मा फुले समता परिषदेचे बाळासाहेब कर्डक, संतोष सोनपसारे,कैलास झगडे,राजेंद्र भगत,बबलु सोनवणे,मनसेचे शहर चिटणीस अजिंक्य गीते,मुकेश शहाणे,शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकर, प्रकाश घुगे,विशाल गाडेकर,आरपीआय  चे नेते प्रकाश लोंढे, सुनील कांबळे, अमोल पगारे,प्रकाश पगारे,शेखर भालेराव,समाधान जगताप, पिपल्स रिपब्लिकन चे शशिकांत उन्हवणे,भारिप चे दीपचंद दोंदे, ,चर्मकार संघटन जिल्हाध्यक्ष प्रकाश पवार, समस्त शिंपी समाजाचे अध्यक्ष अरुण नेवासकर,अजय देव्हारे,ज्ञानेश्वर अवसरकर, अशोक कालेकर, बाळासाहेब खर्डे, नाभिक समाजाचे प्रदेशाध्यक्ष भगवान बिडवे,कार्यकर्ते रविंद्र निकम,महाराष्ट्र कुंभार समाजाचे शहर अध्यक्ष रमाकांत क्षिरसागर,बाळासाहेब जोरवेकर व उपाध्यक्ष राधेशाम गायकवाड,कोषाध्यक्ष रमाकांत क्षिरसागर, महाराष्ट्र खाटिक महासंघाचे सरचिटणीस लक्ष्मण  मंडाले, नाशिक जिल्हा वंजारी समाजाचे प्रकाश घुगे, सिडको शिंपी समाजाचे अध्यक्ष अजय देव्हारे, नाशिक शहर स्वकुळ साळी समाजाचे अध्यक्ष मोहन गायकवाड,सुरेश मानकर,गणेश तांबे,अनिल दिवाणे,महाराष्ट्र विश्वकर्मा सेनेचे कैलास मोरे,वीरशैव गवळी समाजाचे अनिल कोठुळे,नाशिक शहर परदेशी धोबी समाजाचे शहर अध्यक्ष नरेंद्र परदेशी,जिल्हाध्यक्ष जयराम वाघ,अनिल परदेशी,आहिर सुवर्णकार समाजाचे कार्यकर्ते तथा भाजपचे सचिव नितीन वानखेडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हासचिव गौरव विसपुते,  लाड सुवर्णकार संस्थेचे कृष्णा नागरे,लाडशाखीय वाणी समाजाचे सचिन राणे,कमलेश येवले,प्रमोद नाथेकर,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे दिपक वाघ,सचिन जाधव सिन्नर ओबीसी संघटनेचे शरद माळी,गोवर्धनचे सरपंच प्रल्हाद जाधव आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने