येवला व्यापारी महासंघातर्फे आषाढी एकादशीनिमित्त महाप्रसादाचे वाटप.

येवला व्यापारी महासंघातर्फे आषाढी एकादशीनिमित्त महाप्रसादाचे वाटप.

येवला : पुढारी वृत्तसेवा

    प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या येवले तालुक्यातील विठ्ठलाचे कोटमगाव येथील विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनासाठी हजारोंनी तालुक्यातून व शेजारच्या तालुक्यातून वारकरी पायी तसेच गाड्यांमधून आज कोटमगाव येथे येत होते .या सर्व वारकरी बांधवांसाठी फराळाची व्यवस्था व्हावी यासाठी येवला व्यापारी महासंघाने देवीचे कोटमगाव येथे येणाऱ्या सर्व दिंड्यांसाठी साबुदाणा खिचडी व पाणी पाऊस ची व्यवस्था केली होती. या कार्यक्रमासाठी येवला व्यापारी महासंघातील सर्व व्यापारी बांधवांनी आपले भरभरून योगदान दिले .तसेच जगदंबा देवी देवस्थान कोटमगाव  मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष रावसाहेब कोटमे व व्यवस्थापक राजेंद्र कोटमे तसेच कोटमगाव ग्रामपंचायतचे सरपंच श्री अर्जुन कोटमे तसेच कोटमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब लहरे यांच्या सहकार्याने व्यापारी महासंघाचा कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार झाला ...येवला व्यापारी महासंघातील अनेक ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी तसेच येवला तालुक्याचे तहसीलदार श्री प्रमोद हीले साहेब तसेच येवला शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भगवान मथुरे साहेब यांनी या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती लावली ...तसेच व्यापारी महासंघाच्या या कार्याचे कौतुक देखील केले... अगदी कमी वेळेमध्ये व्यापारी महासंघाने या महाप्रसादाचे आयोजन केले.... नव्यानेच स्थापन झालेल्या येवला व्यापारी महासंघास महासंघातील तसेच येवले शहर व तालुक्यातील ज्येष्ठ व्यापारी बांधवांचे मौल्यवान मार्गदर्शन मिळाले... त्यांच्या मार्गदर्शनानेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला... सुमारे 325 किलो साबुदाण्याची खिचडी व 10 हजार पाण्याचे पाऊच वाटप करण्यात आले... तरीदेखील सायंकाळी अनेक दिंड्या या महाप्रसादापासून वंचित राहिल्या. याकरिता व्यापारी महासंघाने वारकरी बांधवांची दिलगिरी व्यक्त केली .तरीदेखील पुढील वर्षी यापेक्षा जास्त मोठे नियोजन करून सर्वांना महाप्रसाद मिळेल याची व्यवस्था येवला व्यापारी महासंघाकडून  करण्यात येईल याची ग्वाही येवला व्यापारी महासंघातील उपस्थित सर्व  व्यापारी बांधवांनी व्यक्त केली. याप्रसंगी देवी मंदिर विश्वस्त व कोटमगाव सरपंच यांचा सत्कार व्यापारी महासंघातर्फे करण्यात आला .तसेच जगदंबा मंदीर  देवस्थान विश्वस्त व सरपंच यांनी आपण चांगला कार्यक्रम देवी मंदिर परिसरात घेतला व त्याची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली म्हणून येवला व्यापारी महासंघाच्या सर्व सदस्यांना नारळ देऊन सन्मानित केले  या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी येवला व्यापारी महासंघाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व व्यापारी महासंघातील सुमारे 700 व्यापारी बांधवांनी मेहनत घेतली.
थोडे नवीन जरा जुने