सत्ता बदलली तरी येवल्याचा विकास मी कधीही थांबू देणार नाही - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ


 'कहा धुंडे सबका साथ,सबका विकास, कोई बता नही रहा, कब होगी महेंगाई पर मात' 

सत्ता बदलली तरी येवल्याचा विकास मी कधीही थांबू देणार नाही - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ


येवला : पुढारी वृत्तसेवा

 सत्ता असली काय आणि नसली काय, येवलेकरांचे प्रेम आमच्यावर नेहमी आहे. हे कधी तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. सत्ता बदलली तरी मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो या येवल्याचा विकास मी कधीही थांबू देणार नाही. राज्यात कितीही सत्तांतर झाले तरी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघ हा किती मजबुतीने उभा राहील हे आपण सर्व दाखवून देऊ असे सांगत नाशिक जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला जाईल असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.


येवला येथील राधाकृष्ण लॉन्स येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी त्यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर,अरुण थोरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बनकर, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख,शहराध्यक्ष दीपक लोणारी, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष अकबर शहा, ज्येष्ठ नेते ऍड.बाबासाहेब देशमुख,माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, बाळासाहेब गुंड, भाऊसाहेब भवर, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार,  सचिन कळमकर, महिला शहराध्यक्ष राजश्री पहिलवान, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, दत्तात्रय डुकरे, डॉ.श्रीकांत आवारे, दत्तात्रय रायते,भाऊसाहेब बोचरे, अशोक नागरे, मकरंद सोनवणे, प्रसाद पाटील,शिवाजी सुपनर, सचिन दरेकर, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, मकरंद सोनवणे,भाऊसाहेब धनवटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गेल्या काही दिवसात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत,पवार साहेबांच्या विचारांचे राज्यात असलेले महाविकास आघाडीचे, आपल्या विचारांचे आणि विकासकामे करणारे सरकार गेले. आता नवीन सरकार आले आहे.राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारने जनहिताची कामे करावीत असे सांगत नव्याने स्थापन झालेलं सरकार किती दिवस कार्यरत राहील हे म्हणण्यापेक्षा नांदा सौख्य भरे अशा शुभेच्छा देत त्यांनी चिमटा काढला.

ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर तीन ते चार चक्रीवादळ आली. अतिवृष्टी, महापूर, वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीतून लोक सावरत असतांना लगेच राज्यावर कोरोनाचे मोठे संकट आले.या अनेक संकटांचा सामना करत असतांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने राज्यातील नागरिकांचा जीव वाचविण्यासोबतच अनेक विकासाची कामे राज्यात केली. नाशिक जिल्ह्यात ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टची निर्मिती करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्ज माफी देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेड केली अशा दोन लाखांहून अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


ते म्हणाले की, नव्याने स्थापन झालेल्या सरकारने नाशिक जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या कामांना स्थगिती दिली. मी लोकप्रतिनिधींना सम प्रमाणात निधी द्या त्यांच्या मागण्यांनुसार कामे करा असे आदेश मी दिले होते. नाशिकच्या विकासात खीळ बसू नये म्हणून मी ऑनलाईन बैठका घेतल्या आणि जनतेची कामे थांबू नये असे आदेश दिले होते. आता केवळ नाशिक जिल्ह्यात नाही तर राज्यातील जिल्हा नियोजनच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात आपण मंजूर केलेली कामे पूर्ण होतील. यातील कुठलेही काम रद्द होणार नाही असा विश्वास त्यांनी उपस्थित नागरिकांना दिला.


ते म्हणाले की, कांद्याला मिळत असलेल्या सद्याच्या भावामुळे उप्तादन खर्च निघणे देखील कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. घरगुती सिलेंडरचे दर ५० रू. ने वाढले आहे.केंद्र शासनाच्या धोरणामुळे खतांच्या व बियाणांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याने शेतकरी अडचणीत आले असल्याचे सांगत 'कहा धुंडे सबका साथ,सबका विकास, कोई बता नही रहा, कब होगी महेंगाई पर मात' या शायरी द्वारे सरकारवर टीका केली.


ते म्हणाले की, आता आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. ती म्हणजे अधिक अधिक लोक आपल्यासोबत जोडून घ्या. येणाऱ्या काळात पक्षसंघटना अधिक मजबुत करण्यासाठी काम करायचे आहे. प्रत्येक तालुका, शहर, गावे बूथ कमिट्या मजबूत करून सर्व कार्यकारिणी ऍक्टिव्ह करा. नाशिक जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका, बाजार समित्या यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शिवसेना जरी अडचणीत आली असली तरी पवार साहेब व सर्व महाविकास आघाडी सरकारमधील घटक उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या जुन्या शिवसैनिकांना सोबत घेऊन त्यांना आधार द्यावा असे त्यांनी यावेळी सांगितले.


*महाविकास आघाडी सरकारच्या काळात मतदारसंघात झाली कोट्यवधी रुपयांची कामे*

मतदारसंघात श्री क्षेत्र कोटमगाव 'ब' वर्ग पर्यटन स्थळ दर्जा, येवला मुक्तीभूमीचा विकास आणि 'ब' वर्ग पर्यटन स्थळ दर्जा,येवला शिवसृष्टी प्रकल्प, मांजरपाडा प्रकल्प 
येवला अडतीस गावे पाणी पुरवठा योजनेचे नुतनीकरण / पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प, लासलगाव विंचूरसह सोळा गावे पाणी पुरवठा योजना नुतनीकरण व सौर उर्जा प्रकल्प,राजापूर सह ४१ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, धुळगावसह १८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, निफाड तालुक्यातील १९ तर येवला तालुक्यातील २५ गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नूतन नळपाणी पुरवठा योजना, येवला तालुक्यातील ५९ बंधाऱ्यासाठी २७ कोटी ८७ लक्ष निधी, येवला ५० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय रुपांतर, लासलगाव ३० खाटांच्या  ग्रामीण रुग्णालयाचे ५०, खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर, मतदारसंघातील येवला उपजिल्हा रुग्णालय, लासलगाव उपजिल्हा रुग्णालय, नगरसूल ग्रामीण रुग्णालय याठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती, येवला चिचोंडी औद्योगिक वसाहतीत पायाभूत सुविधांचा विकास 
विंचूर व येवला औद्योगिक क्षेत्रासाठी एकत्रित पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता; योजनेसाठी २१ कोटींचा निधी,येवला भुयारी गटार योजनेसाठी ५२ कोटी ४६ लक्ष तरतूद,येवला शहरातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, उद्यानांचा विकास,विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका व वाचनालय, लासलगाव रेल्वे उड्डाणपूल बाह्य वळण रस्ता 
पायाभूत सुविधांचा विकास यासह अनेक विकासाची कामे करण्यात आली असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सांगितले.


यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर ऍड.बाबासाहेब देशमुख, जयदत्त होळकर, माजी जिल्हा परिषद  अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, हुसेन शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, भाऊसाहेब भवर,  माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, अकबर शहा, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, डॉ.श्रीकांत आवारे, दत्तात्रय रायते, भाऊसाहेब बोचरे, दत्तात्रय डुकरे, प्रसाद पाटील, श्री.आहेर, अनिल सोनवणे, ज्ञानेश्वर कदम, विलास गोऱ्हे, राजेश शेख, बाळासाहेब दाणे, सचिन सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
थोडे नवीन जरा जुने