अनकाई किल्ल्यावर 2 तरुणांचा तलावात बुडुन मृत्यु

अनकाई किल्ल्यावर 2 तरुणांचा तलावात बुडुन मृत्यु


 येवला : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील अनकाई किल्ल्यावर 2 तरुणांचा तलाव मध्ये बुडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  मंगळवारी येवला शेजारी कोपरगाव येथील काही पर्यटक अनकाई किल्ल्यावर पर्यटनासाठी आले होते.

यात कोपरगाव शहरात राहणारे मिलिंद रवींद्र जाधव (20) आणि रोहित पिंटू राठोड (14) दोघे राहणार धारणगाव रोड कोपरगाव हे पोहण्यासाठी अनकाई किल्ल्यावरील तळ्यात उतरले असता पाण्याचा व तळ्याच्या खोलीचा अंदाज आला नसल्याने दोघा मित्राचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती इतर पर्यटकांनी गावातीलच रमजान सय्यद यांना दिली रमजान सय्यद यांनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजूसिंग परदेशी यांना घटनेची माहिती दिली परदेशी यांनी तात्काळ येवला तालुका पोलिसांना माहिती दिली यानंतर गावातील ग्रामरक्षक दलातील पोहणाऱ्या तरुणांच्या साह्याने बुडालेल्या दोघा तरुणांचा मृतदेह एक तासाच्या अथक प्रयत्न नंतर तलावातून बाहेर काढण्यात आला.
थोडे नवीन जरा जुने