छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश येवला शिवसृष्टीच्या कामाची स्थगिती शासनाने उठविली

छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश


येवला शिवसृष्टीच्या कामाची स्थगिती शासनाने उठविली


येवला :- पुढारी वृत्तसेवा

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर शासनाने अखेर येवला येथील शिवसृष्टीच्या कामाची स्थगिती उठविली आहे. त्यामुळे शिवसृष्टीचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .


छगन भुजबळ यांच्या ड्रीम प्रोजेक्ट पैकी एक असलेल्या येवला शिवसृष्टीसाठी शासनाकडून प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत ४ कोटी रुपयांचा कामांना प्रशासकिय मान्यता देण्यात आलेली होती. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली होती. या कामाची स्थागिती उठवण्यासाठी छगन भुजबळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला.राज्याच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी याबाबत आवाज उठवीत शासनाकडे या कामाची स्थगिती उठवून काम पूर्ण करण्याची मागणी केली होती.


याबाबत शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 
प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत सन २०२१- २२ या वर्षामध्ये प्रशासकीय मान्यता दिलेल्या "येवला येथे शिवसृष्टीच्या कामासंदर्भात पुढील कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.


त्यानंतर छगन भुजबळ यांचा हे काम पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२१-२२ अंतर्गत  येथील शासन निर्णयाअन्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या "येवला येथे शिवसृष्टी उभारण्यासाठी या कामाबाबत पुढील कार्यवाही करण्यास परवानगी देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच उर्वरित कामास सुरुवात होऊन हे काम अधिक गतीने पूर्ण केले जाणार आहे.


येवला शिवसृष्टीमध्ये या कामांचा असेल सामावेश...

छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती ब्राँझ पुतळा,शिवकालीन ऐतिहासिक घटनांचे म्यूरलस्, गार्डन, माहिती केंद्र, उपहारगृह, स्वच्छ्ता गृह इत्यादी.
थोडे नवीन जरा जुने