येवला येथील संत निरंकारी मंडळाकडून अंगणगाव घाट येथे राबविले स्वच्छता अभियान

 


 

"येवला येथील संत निरंकारी मंडळाकडून अंगणगाव घाट येथे राबविले स्वच्छता अभियान"

येवला : पुढारी वृत्तसेवा

 सद्गुरू माता सुदीक्षाजी यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी मंडळाच्या वतीने "स्वच्छ जल स्वच्छ मन" या विचाराने प्रेरित संत निरंकारी मिशन अंतर्गत येवल्यातील संत निरंकारी मिशनचे मुखी महात्मा  सुनील गंभीर व सेवादल मुखी महात्मा   सागर भावसार यांनी संत निरंकारी मंडळाचे अनुयायी व सेवादल महात्मा यांचेकडून अंगणगाव येथील घाटांची सफाई करण्यात आली .

सद्गुरू बाबा हरदेव सिंग महाराज यांच्या 64 व्या जयंती निमित्त 23 फेब्रुवारी 2024 हा दिवस गुरु पूजा दिवस साजरी करण्यात आला असुन त्यांच्या " प्रदूषण अंदर हो या बाहर हानिकारक हैं " या विचारातून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या संत निरंकारी मंडळाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन मिशन सुरू करण्यात आले असून सद्गुरु माता सुदिक्षा जी यांच्या मार्गदर्शनाखाली  25 फेब्रुवारी   रोजी सकाळी 8 ते 12 वा. पर्यंत देशभरातील पाच हजाराहून अधिक शाखा अंतर्गत नदीवरील घाटांची स्वच्छता करण्यात येत आहे. 
स्वच्छ पाण्यामुळे आपले मन स्वच्छ राहील असा संदेश संत निरंकारी मंडळातर्फे देण्यात येत असून नाशिक जिल्ह्यातील पस्तीस शाखांच्या अंतर्गत येवला शाखा असून या शाखेमार्फत अंगणगाव येथील घाटांची स्वच्छता करण्यात आली सुमारे दोन ट्रॉली कचरा निरंकारी मंडळ तर्फे संकलित करण्यात आला विशेष म्हणजे येवला शहर पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी स्वतः हातात झाडू हातात घेऊन या स्वच्छता मोहिमेत हिरारीने सहभाग घेतला असून नागरिकांनी देखील या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन येवला शाखेचे प्रबंधक सुनील गंभीर यांनी केले आहे
याप्रसंगी, सागर भावसार, नितीन, लोखंडे, सुनील लधाणी, दीपक काळे, नरेंद्र भावसार, प्रमोद कटारे, गणेश लोहरक्र, योगेश देशमुख, जयश्री काळे, लाविना लधनी, वंदना, भावसार, पूजा भावसार, सुवर्ण तक्ते, करून काळे आदी संत निरंकारी मंडळाचे सेवादल महात्मे सफाईसाठी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने