शिक्षक नेते कर्तारसिंग ठाकुर यांनी कविवर्य कुसुमाग्रज सन्मान पुरस्कार जाहीर

 शिक्षक नेते कर्तारसिंग ठाकुर यांनी कविवर्य कुसुमाग्रज सन्मान पुरस्कार जाहीर 

येवला,ता.२६ : नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे मराठी साहित्य तथा भाषा क्षेत्रात विशेष कामगिरीबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठेचा कविवर्य कुसुमाग्रज सन्मान विनाअनुदानित कृती समितीचे शिक्षक नेते प्रा.कर्तारसिंग गोकुळसिंग ठाकुर यांना जाहीर झाला आहे.

कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती तथा मराठी भाषा गौरव दिनी कुसुमाग्रजांचे जन्मगाव शिरवाडे वणी येथे पुरस्कार सोहळा संपन्न होणार असून मान्यवरांच्या उपस्थित होणाऱ्या विशेष सोहळ्यात मराठी भाषा क्षेत्रात कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील नामवंत व्यक्तींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान होणार आहे.अशी माहिती नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश सलादे यांनी दिली.

प्रा.ठाकुर जय योगेश्वर भगवान सामाजिक,शैक्षणिक मंडळ विंचूरे संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,कोचरगाव (ता.दिंडोरी) येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी युवक बिरादरी आयोजित एक सुर एक ताल या उपक्रम अंतर्गत तब्बल साडे तीन लाख शालेय विद्यार्थ्यांना विविध भाषेतील राष्ट्रीय एकात्मता संस्कार मुल्याधारित गीते शिकविली.

शैक्षणिक,सामाजिक,राजकीय कार्यक्रम,शिवजयंती,समाजिक उपक्रम दिन,स्नेहसंमेलन अशा अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी सांगीतिक कार्यक्रम आणि सूत्रसंचालने केलेली आहेत.

आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलन व ग्रामीण साहित्य संमेलन यामधील सहभाग,विविध युवक व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात संगीत विषयाच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत असतात.तसेच नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धात केंद्र,बीट आणि तालुका स्तरावर सांस्कृतिक स्पर्धांचे वेळोवेळी परीक्षण करीत असतात.गीतलेखन,गायन आणि विवध वाद्य वादन ह्या कलाप्रकार प्रवीण असलेले प्रा.ठाकुर सर यांचे कार्य उल्लेखनिय आहे.सामाजिक विषयावर पथनाट्य,एकांकिका निर्मिती,समूह गीत,लोकगीत निर्मिती,नृत्य बसविणे हे विविध कलागुण त्यांनी लीलया आत्मसात करून विद्यार्थ्यांसाठी त्याचा उपयोग करून घेतात.

शासनाच्या स्वच्छ्ता अभियाना अंतर्गत त्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.यासह कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धेत सांगीतिक सहभाग,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठात युवक व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात सांगीतिक मार्गदर्शन केले आहे.नाशिक जिल्हा अध्यापक संघाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन कविवर्य कुसुमाग्रज सन्मान जाहीर केला त्याबद्दल प्रा.श्री.कर्तारसिंग ठाकुर यांचे संस्थेचे चेअरमन संजय गायकवाड, कोचरगाव विद्यालयाचे प्राचार्य श्री.वाकचौरे आदींनी अभिनंदन केले आहे.


थोडे नवीन जरा जुने