अनकाई गावाचा सुपुत्र, जवान सचिन परदेशी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त भव्य नागरी सत्कार!
येवला (वार्ताहर) : देशाच्या सीमेवर १६ वर्षे असीम धैर्य आणि निष्ठेने सेवा बजावल्यानंतर आपल्या मूळगावी अनकाई (ता. येवला) येथे परतलेले सुपुत्र, हवालदार सचिन विजयसिंग परदेशी यांचा ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. भारतीय सैन्य दलाच्या रेजिमेंट आर्टिलरीमध्ये कार्यरत असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन देशाची सेवा केली.
सचिन परदेशी यांच्या या गौरवशाली सेवेचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ काले, माजी पंचायत समिती सभापती डॉ. सुधीर जाधव, अनकाईचे माजी सरपंच अल्केश कासलीवाल आणि भारतीय सैन्य दलातील सुशील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभलेल्या सैन्यातील सहकारी रत्नाकर जगझाप, शंकर ढोकळे, कांतु काळे, बबन बटवल, गणेश भागवत, एस शिंदे, ज्ञानेश्वर दाभाडे या जवानांनी सचिन परदेशी यांच्या देशसेवेचे कौतुक केले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला अधिकच शोभा आली.
यावेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे तालुकाध्यक्ष किरणसिंग परदेशी यांच्यासह सुधीरसिंग परदेशी, विजयसिंग परदेशी, नंदूसिंग परदेशी, गट्टूसिंग परदेशी, संतोषसिंग परदेशी, पंकजसिंग परदेशी, निलेशसिंग परदेशी, पवनसिंग परदेशी, जयेशसिंग परदेशी, गोलूसिंग परदेशी, शक्तीसिंग परदेशी, आकाशसिंग परदेशी, दर्शनसिंग परदेशी आणि अन्य नातेवाईक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या संपूर्ण कार्यक्रमात, सचिन परदेशी यांच्या निस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता आणि आदराची भावना दिसून आली. त्यांच्या या गौरवशाली वाटचालीमुळे अनकाई गावाचा आणि परिसराचा गौरव वाढला आहे, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्वांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.