ओम गुरुदेव इंग्लिश मिडीयम चे कराटे स्पर्धेत यश

 

ओम गुरुदेव इंग्लिश मिडीयम चे कराटे स्पर्धेत यश

येवला - प्रतिनिधी

नुकत्याच नाशिक येथे आर्यन कराटे एकॅडेमीच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे स्पर्धेमध्ये येवला शहरातील ओम गुरुदेव इंग्लिश मिडीयम गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या अकरा खेळाडूपैकी पवन रुपेश मांजरे, भूमी राकेश मांजरे यांनी सुवर्णपदक मिळवले. तर पायल थळकर,सर्वेश गाडेकर,रोशनी कोतवाल,श्रेयस नागरपुरे,आर्यन बोरसे यांनी रौप्यपदक मिळवले.समिक्षा थळकर,वैष्णवी चव्हाण,आदित्य आहेर,सर्वेश चव्हाण यानी कांस्यपदक मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांना अविाश बोंडारे यांचे मार्गदर्श लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष हनुमंत भोगंळे,प्रा. तुषार कापसे व शिक्षकांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

थोडे नवीन जरा जुने