नगरसुलचा सरपंच प्रमोद पाटील या मुख्य आरोपीच्या अटकेसाठी अत्याचारीत महिलेचे आमरण उपोषण

येवला - जगात कार्यक्रम आणि उपक्रमांनी महिला दिन साजरा होत असताना भारतातील महिलांवर मात्र आज ‘दीन’ वाणे न्याय मागत फिरण्याची पाळी आली आहे. याची प्रचीती येथील तहसील कार्यालयासमोर फेरफटका मारतांना येते. नगरसुल येथील अत्याचार पीडित महिलेने मुख्य आरोपीला अटक करावी या मागणीकरिता आज ‘महिला दिना’पासूनच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
३० जानेवारी रोजी तिघाजणांनी आपल्यावर बलात्कार केल्याची फिर्याद नगरसुल येथील एका विवाहित महिलेने तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती. अत्याचार पीडित विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी संतोष गंडाळ या आरोपीला लगेचच अटक केली होती. यानंतर किरण तांगडे या दुसर्‍या आरोपीला २८ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. परंतु मुख्य आरोपी असलेला नगरसुलचा सरपंच प्रमोद पाटील मोकाटच आहे. त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाचा इशारा या अत्याचारपीडित विवाहित महिलेने तहसीलदारांना दिला आहे.
थोडे नवीन जरा जुने